Friday, March 28, 2025
Homeदेशकोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण, रुग्णालय तोडफोडप्रकरणी १२ आरोपी अटकेत

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण, रुग्णालय तोडफोडप्रकरणी १२ आरोपी अटकेत

नवी दिल्ली: कोलकातामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) स्पेशल क्राइम टीमने एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची माहिती घेतली. एजन्सीने हा दौरा पूर्ण केला आहे. यासोबतच सीबीआयने ५ डॉक्टरांचा समन्स बजावले आहे. तसेच या रुग्णालयात तोडफोड केल्या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

सीबीआयच्या टीमने पहिल्या मजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत तपासणी केली.टीमने वर जाऊन पाहिले की किती नुकसान झाले आहे आणि तसेच जिथे ही घटना घडली तेथे उपद्रव्यांनी काही तोडफोड केली का याचीही तपासणी केली.

सीबीआयने ही केस हाती घेऊन दोन द्वस झाले आहे. घटनेच्या दिवशी रात्री असे काय घडले होते याचा तपास एजन्सी करत आहे. पोलीस या घटनेचा तपास कसे करत होते आणि रुग्णालय प्रशासन पोलिसांना कशा प्रकारे मदत करत होते याचाही तपास केला जात आङे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय सध्या आरजी करचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांच्याबाबत माहिती मिळवत आहे. तसेच नर्सिग स्टाफकडेही चौकशी केली जात आहे.

या घटनेविरोधा डॉक्टरांनी केलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान अज्ञात लोकांच्या एका गटाने रुग्णालयात घुसखोरी केली होती. या हल्लेखोरांनी आपातकालीन विभाग आणि नर्सिंग स्टेशनमध्ये तोडफोड केली तसेच औषधांच्या दुकानांचीही तोडफोड केली होती. तेथील सीसीटीव्हींचेही नुकसान केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -