मुंबई: आज संपूर्ण भारत देश ४८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या निमित्ताने अनेक टेलिकॉम कंपन्यां अनेक खास ऑफर्स देत आहेत. या निमित्ताने जिओनेही अशीच ऑफर सादर केली आहे. ही ऑफर नक्कीच एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि खासकरून बीएसएनएलला मोठी टक्कर देऊ शकतात.
जिओची शानदार ऑफर
जिओच्या या ऑफरचे नाव फ्रीडम ऑफर आहे. जिओची ही खास ऑफर त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या घरी वायफाय लावायचे आहे. जर तुम्ही एअरटेल, व्हीआय अथवा बीएसएनएलप्रमाणेच कोणतीही ब्रॉडबँड सर्व्हिस देणारी कंपनी वायफाय सर्व्हिस आपल्या घरी लावत असेल तर त्यासाठी वन टाईम इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागते.
रिलायन्स जिओची वायफाय सर्व्हिस म्हणजेच जिओ एअरफायबरला इन्स्टॉल करण्यासाठी ग्राहकांना वन टाईम इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागतात याची फी १००० रूपये आहे. दरम्यान, जिओने स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने जिओ एअरफायबर आपल्या नव्या ग्राहकांना फ्री इन्स्टॉलेशन सर्व्हिस देण्याची ऑफर आणली आहे.
१००० रूपयांचा होणार फायदा
याचा अर्थ जर तुम्ही जिओ एअरफायबरची नवी सर्व्हिस आपल्या घरी लावत असाल तर तुम्हाला १००० रूपये वन टाईम इन्स्टॉलेशन फी द्यावी लागणार नाही. तुम्ही सरळ १००० रूपयांची बचत करू शकता. दरम्यान, जिओच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.
जिओची ही फ्रीडम ऑफर ३ महिन्याच्या ब्रॉडबँड प्लानसाठी आहे. जिओच्या या प्लानसाठी युजर्सला २१२१ रूपये खर्च करावे लागतील. या एअरफायबर प्लानसोबत युजर्सला ३० एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड, १००० जीबी डेटा, १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.
जिओच्या नावाने विविध योजनांच्या बातमी लोकांपर्यंत सोशल मीडियावर प्रसारित केल्या जातात, परंतु या बातम्या निरर्थक आणि बिनकामाच्या असतात. वरील बातमी देखील तशीच आहे. सध्या बऱ्याच कंपन्या इंस्टोलेशन चार्जेस घेत नाही. त्यात जियो जर घेत नसेल तर त्यात काहीही आश्चर्य नाही. आपण लोकल केबल नेटवर्क च्या माध्यमातून देखील चांगले प्लॅन स्वीकारू शकता. मी नुकतेच जियो पेक्षा 10 Mbps अधिक स्पीड असलेला प्लॅन लोकल केबल नेटवर्क च्या माध्यमातून 40 mbps चा प्लॅन अवघ्या 3000 मध्ये घेतला असून, त्यांनी माझ्याकडून कोणतेही अधिक शुल्क मोजावे लागले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कुणीही अशा निरर्थक प्लॅन बद्दल माहिती देऊ नये. लोकांनी यापासून सावध राहिले पाहिजे…