Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीIndiGo Airline: इंडिगो महिलांना देणार नवे पंख, एअरलाईनमध्ये १०००हून अधिक होणार पायलट

IndiGo Airline: इंडिगो महिलांना देणार नवे पंख, एअरलाईनमध्ये १०००हून अधिक होणार पायलट

मुंबई: इंडिगो एअरलाईनने आपल्या कामाच्या ठिकाणी महिलांना अधिकाधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोने एका वर्षाच्या आत महिला पायलटची संख्या १०००हून अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एअरलाईनमध्ये ८००हून अधिक महिला पायलट आहेत. इंडिगोचे काही पायल संख्येमध्ये महिलांचा आकडा साधारण १४ टक्के आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीने ७ ते ९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कंपनीला ही संख्या अधिक वाढवायची आहे.

पुढील वर्षापर्यंत गाठायचेय ध्येय

देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोचे चीफ ह्यूमन रिसोर्स मॅनेजर सुखजीत एस पसरीचाने गुरूवारी सांगितले की महिलांना ते सातत्याने संधी देत आहेत. आत आमचे लक्ष्य पायलटची संख्या १०००च्या वर जाणे आहे. हा आकडा आम्ही पुढील वर्षापर्यंत गाठायचा आहे. यामुळे आमच्या वर्कफोर्समध्ये विविधता आणि अधिक वाढेल. एअरलाईन आपल्या फ्लीट आणि नेटवर्कमध्ये विस्तार करत आहे.

इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफमध्ये मिळणार संधी

सुखजीत एस पसरीचाने सांगितले की इंडिगो इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफमध्ये मोठे बदल करत आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी महिलांना संधी देत आहोत. आमच्या इंजीनियरिंग टीममध्येही महिलांची संख्या साधारण ३० टक्के वाढली आहे. एअरलाईनकडे देशातील सर्वाधिक ८०० महिला पायलट आहे.

स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण झाल्यावर ७७ महिला पायलटना दिली नोकरी

इंडिगोने बुधवारी ७७ महिला पायलटना नोकरी दिली आहे. या महिला कंपनीच्या एअरबस आणि एटीआर विमाने उडवतील. स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होण्यानिमित्त महिला पायलटना नोकरी देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -