मुंबई: इंग्रजांच्या गुलामगिरीच्या तावडीतून देशाला आजच्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले होते. आज या स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात ओसंडून वाहत आहे. अशातच गुगलनेही डूडलच्या माध्यमातून ७८व्या स्वातंत्र्यदिनाचे सेलीब्रेशन केले आहे.
गुगल दर वर्षी डूडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिवस खास बनवत असतो. जाणून घेऊया या वेळेस गुगलची डूडल थीम काय आहे आणि हे कोणी बनवले?
कोणी बनवले २०२४चे डूडल?
१५ ऑगस्ट २०२४चे गुगल डूडल रविंद्र जावेरी यांनी बनवले आहे. रविंद्र फ्रीलान्स आर्ट डायरेक्टर, इलस्ट्रेटर आणि अॅनिमेटर आहे. ते एडिटोरियल इलस्ट्रेशन बनवण्याशिवाय सेल अॅनिमेशन, स्टाईल फ्रेम्स आणि मोठमोठ्या कंपन्या, स्टुडुओ आणि विविध इंडस्ट्रीजसाठी प्रॉडक्ट इलस्ट्रेशनही बनवतात. यावेळेस ते अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात.
काय आहे थीम
२०२४च्या स्वातंत्र्य दिनी गुगल डूडलची थीम आर्किटेक्चर ठेवण्यात आली आहे. याच्या मदतीने देशातील विविध संस्कृतींना एकाच धाग्यात गुंफले आहे. यात विविध स्ट्रक्चर दाखवण्यात आले आहेत.