नवी दिल्ली: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवणही केली. पंतप्रधान मोदी म्हणाले जेव्हा आपण ४० कोटी होतो तेव्हा महासत्तेला हरवले होते. आज तर आपण १४० कोटी आहोत.
संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदींना स्वदेशी १०५ एमएम लाईट फिल्ड गनने २१ तोफांची सलामी देण्यात आली. सोबळ्यात ६००० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.पाहा काय म्हणताहेत पंतप्रधान मोदी
४० कोटी लोकांनी तोडल्या होत्या गुलामीच्या बेड्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझ्या प्रेमळ देशवासियांनो आपण जरा स्वातंत्र्यांचे ते दिवस आठवूया. शेकडो वर्षांची गुलामी, प्रत्येक कालखंड संघर्ष करत आहोत. महिला असो, तरूण असो, आदिवासी असो सगळे गुलामीविरोधात युद्ध लढत आहेत. १८५७चा स्वातंत्र्या संग्रामाचे हिरो अनेक आदिवासी भागातून होते. तेथे स्वातंत्र्याची लढाई लढली जात होते. त्यावेळेस ४० कोटी लोकांनी जे सामर्थ्य दाखवले.
एकच संकल्प घेऊन ते चालत होते, त्यासाठी लढत होते. तेव्हा एकच स्वप्न होते वंदे मातर, देशाचे स्वातंत्र्य. ४० कोटी लोकांनी जगातील महासत्तेला काढून फेकले होते. त्याच पूर्वजांचे रक्त आपल्या शरीरात आहे. आज आपण १४० कोटी लोक आहेत. त्यामुळे आपण जर एक संकल्प केला एक दिशा निर्धारित करून चाललो तर नक्कीच २९४७ पर्यंत विकसित भारत बनू शकतो.
नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढल्या
गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे चिंता अधिक वाढली आहे. या नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपली कुटुंबे गमावली. संपत्ती गमावली आहे. आज मी त्या सगळ्यांबद्दल संवेदना व्यक्त करतो.