मुंबई:व्हिटामिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच इम्युन सिस्टीम मजबूत होण्यास मदत होते. व्हिटामिन डीचा सगळ्यात चांगला स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. मात्र आता सवाल हा आहे की उन्हात किती वेळ राहिले पाहिजे ज्यामुळे शरीराला पुरेसे व्हिटामिन डी मिळू शकेल. जाणून घेऊया याचे उत्तर
उन्हात किती वेळ राहिले पाहिजे?
दररोज उन्हामध्ये १५ ते ३० मिनिटे राहिल्याने शरीरास पुरेसे व्हिटामिन डी मिळते. ही वेळ तुमचा त्वचेचा रंग आणि उन्हाची तीव्रता यावर अवलंबून आहे. त्वचेचा रंग फेअर असेल तर त्या लोकांनी १५-२० मिनिटे उन्हात राहिले पाहिजे. तर डार्क त्वचेच्या लोकांनी २०-३० मिनिटापर्यंत ऊन घेतले पाहिजे. सकाळच्या वेळेस ऊन घेणे चांगले मानले जाते. कारण यावेळेस सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटामिन डी बनणाऱे यूव्हीबी किरणे अधिक प्रभावी असतात.
उन्हाची योग्य वेळ
ऊन घेण्यासाठी योग्य वेळ सकाळी ८ वाजल्यापासून ते ११ वाजेपर्यंतचा असतो. या दरम्यान सूर्याच्या किरणांमध्ये यूव्हीबी किरणे अधिक असतात ज्यामुळे शरीराला व्हिटामिन डी बनण्यास मदत होते. जेव्हा ही किरणे आपल्या त्वचेवर पडतात. त्यामुळे व्हिटामिन डीचे शरीरात उत्पादन होते ज्यामुळे हाडे मजबूत बनण्यास मदत होते.
शरीराचा कोणता भाग उन्हात ठेवणे गरजेचे
शरीराचा २५ ते ३० टक्के भाग जसे हात, पाय आणि पाठीला उन्हात ठेवले पाहिजे. यामुळे शरीराला पुरेसे व्हिटामिन डी मिळू शकेल.
व्हिटामिन डीचे इतर स्त्रोत
जर तुम्हाला उन्हात जायला जमत नसेल तर व्हिटामिन डीचे अन्य स्त्रोतही आहेत. मासे खासकरून सॅलमन आणि ट्युना व्हिटामिन डीचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय अंड्याच्या बलकामध्येही व्हिटामिन डी आढळते जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. मशरूमही व्हिटामिन डीचा नैसर्गिक स्त्रोत आहे. यामुळे व्हिटामिन डी शरीराला मिळते.