Saturday, June 21, 2025

इलेक्ट्रिक वाहने वाढली; पण दुरुस्त करणार कोण?

इलेक्ट्रिक वाहने वाढली; पण दुरुस्त करणार कोण?

मुंबई : सन २०१० पासून आतापर्यंत लो-स्पीड, हायस्पीड अशा अनेक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली. मात्र ही गाडी रस्त्यात बंद पडली, नादुरुस्त झाली तर काय करावे, कुठे जावे असा प्रश्न अनेकांना पडतो. नियमित रस्त्यांवर असलेल्या गॅरेजमध्ये या गाड्या दुरुस्त करता येत नाहीत.


अनेक ठिकाणी नवीन शोरूम सुरू झाल्याने बहुतांश जणांनी इलेक्ट्रिक दुचाकी घेतल्या. दुचाकी घेणाऱ्यांना काही महिन्यांनंतर कळाले की त्यात अनेक अडचणी आहेत.


गाड्यांची वॉरंटी होती, मात्र ज्या शोरूममधून गाड्या घेतल्या त्यातील काही शोरूम बंद झाले तर काही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. तसेच वॉरंटी असली तरी बंद पडते त्या क्षणाला गाडी कुठे घेऊन जायची, ती दुरुस्ती कशी करायची याची माहिती अनेकांनी नव्हती. नॉर्मल गॅरेज चालकांकडे इलेक्ट्रिक गाडी दुरुस्त करता येत नाही त्यामळे इलेक्ट्रीक वाहन बंद पडले तर आता दुरुस्त कोण करणार? असा सवाल नागरिकांना पडला आहे.


पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीची दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकला ई-वाहनांच्या दुरुस्तीचे ज्ञान नाही. इलेक्ट्रिक वाहनाचे पार्टस तुटले किंवा निकामी झाले तर त्यांचे पार्टसदेखील मिळत नाहीत. पार्टसची सोय आणि ई-वाहनांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.



मेकॅनिकची अडचण


रात्रीच्या वेळी ई-दुचाकी बंद पडली तर घामाघूम होत वाहन ढकलत नेण्याची वेळ चालकावर ओढवते. दुरुस्ती येत नसल्याने अनेक मेकॅनिक ई-दुचाकीला हातही लावत नाहीत. ई- मेकॅनिक कमी प्रमाणात आहेत. यातील काही अपवाद वगळता बहुतांश मेकॅनिकला ई-दुचाकीची दुरुस्ती येत नाही. मेकॅनिकला ई-दुचाकीची पुरेशी माहिती नसल्याने बिघाड लक्षात येण्याऐवजी मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >