नवी दिल्ली : हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जाणार आहे. यंदाच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विस्तारा एअरलाइन्सने (Vistara Airlines) एक घोषणा केली आहे. विस्तारा एअरलाइन्सने स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘फ्रीडम सेल’ (Freedom Sale) ची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत एअरलाइन सर्व केबिन वर्गांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांसाठी सवलतीच्या दरात ऑफर (Offer) करणार आहे. त्यामुळे सध्या वीकेंडच्या काळात हवाई प्रवाशांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विस्तारा एअरलाइन्सने स्वातंत्र्य दिनाच्या फेस्टिव्हल सेलमध्ये देशासह इंटरनॅशनल प्रवास करताना तिकीटांच्या दरात सवलत दिली आहे. देशांतर्गत प्रवासामध्ये इकोनॉमी क्लासमध्ये १,५७८ रुपये तिकीट असणार आहे तर प्रिमियम इकोनॉमी क्लाससाठी २६७८ रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ९,९७८ रुपये तिकीट असणार आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल हवाई प्रवासात इकोनॉमी क्लासची तिकीट ११,९७८ रुपये, प्रिमियम इकोनॉमी क्लासची तिकीट १३,९८७ रुपये तर बिझनेस क्लासची तिकीट ४६,९७८ रुपयांपासून सुरु होणार आहे.
बुक कधी करायचे?
ग्राहकांना विस्ताराच्या या विशेष ऑफरचा लाभ ३१ ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. मात्र त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तिकीट बुक करावे लागणार आहे.
येथून तिकीट बुक करा
प्रवाशांना तिकिटे विस्ताराच्या अधिकृत वेबसाइट www.airvistara.com द्वारे किंवा iOS आणि Android मोबाइल ॲप्स, विमानतळांवर स्थित विस्तारा तिकीट कार्यालये (ATOs), विस्तारा कॉल सेंटर्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTAs) आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे बुक करू शकतात.