Saturday, May 10, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

माझ्यासाठी तुम्ही सगळे सुवर्णपदक विजेते आहात...राष्ट्रपतींनी असे केले ऑलिम्पिक खेळाडूंचे स्वागत

माझ्यासाठी तुम्ही सगळे सुवर्णपदक विजेते आहात...राष्ट्रपतींनी असे केले ऑलिम्पिक खेळाडूंचे स्वागत

मुंबई: राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे स्वागत राष्ट्रपती भवनात केले. या दरम्यान राष्ट्रपतींनी म्हटले की मी तुमचे स्वागत करते. मी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरीसाठी तुमचे अभिनंदन करते. तुम्ही माझ्यासाठी सुवर्णपदक विजेते आहात. मला तुमच्यावर गर्व आहे.


तर भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर यांनी राष्ट्रपतींसमोर आपले मनोगत मांडले. या दरम्यान पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकी संघाच्या प्रवासाची आठवण केली. तो म्हणाला, आमच्या संघाने चांगला खेळ केला. मात्र दुर्देवाने सेमीफायनलमध्ये आमचा पराभव झाला.


 


याशिवाय दोन कांस्यपदके जिंकणाऱ्या मनू भाकरलाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मनू भाकरने सांगितले की टोकियो ऑलिम्पिकपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. मात्र आमच्या टीमने खूप मेहनत केली.


मनू भाकरने यावेळी पीटी उषा यांचे आभार मानले. तसेच पीटी उषा मॅडम यांच्यामुळेच आज मी पदक जिंकू शकले अशी मनू भाकर म्णाली. याशिवाय संपूर्ण टीमची कामगिरी चांगली राहिली. आमच्यातील अनेक खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिले आणि मेडल जिंकू शकले नाही. मात्र यावेळेस अनेक खेळाडूंनी आपला खेळ सुधारला.

Comments
Add Comment