Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीJio आणि Airtelपेक्षा खूप स्वस्त आहे हा प्लान, १६६ रूपयांत मिळणार दिवसाला...

Jio आणि Airtelपेक्षा खूप स्वस्त आहे हा प्लान, १६६ रूपयांत मिळणार दिवसाला १.५ जीबीपेक्षा अधिक डेटा

मुंबई: भारताची सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या सध्या खूप चर्चा होत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये बीएसएनएलने गेल्या एक महिन्यात लाखो नवे ग्राहक जोडले आहेत. खरंतर भारतातील तीन खाजगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी जुलै २०२४ या महिन्यात आपल्या प्रीपेड तसेच पोस्टपेड रिचार्ज प्लान्सचे दर वाढवले.

भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीचे हाल

यामुळे संपूर्ण देशातील ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झटका बसला आहे. लाखो ग्राहक यामुळे नाराज झाले आहेत कारण त्यांचे रिचार्ज प्लान्स २० ते ३० टक्के महाग झाले आहेत. बीएसएनएलसाठी ही एक संधीच चालून आली आहे. तसेच लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्लान्स बाजारात आणले आहेत.

बीएसएनएलला या प्रयत्नांचा फायदा झाला आणि गेल्या एका महिन्यात त्यांनी लाखो नवे युजर्स जोडले. यात काही ग्राहक असेही आहेत जे तीन खाजगी कंपन्यांचे नेटवर्क सोडून बीएसएनएलमध्ये आलेत. बीएसएनएलने आपल्या ४जी कनेक्टिव्हिटीला देशभरात पोहोचवण्यासाठी तसेच BSNL 5G कनेक्टिव्हिटीवरही वेगाने काम करण्यास सुरूवात केली आहे.

बीएसएनएलच्या ५जीची सुरूवात २०२५च्या अखेरीसपर्यंत होऊ शकते असा अंदाज काही रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान सध्या युजर्स बीएसएनएलच्या स्वस्त रिचार्ज प्लान्सच्या शोधात आहे.

केवळ १६६ रूपये प्रति महिना खर्च

बीएसएनएलचा हा प्लान १९९९ रूपयांचा आहे. याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आङे. या प्लानसोबत युजर्सला ६०० जीबी हायस्पीड डेटा, दररोज १०० एसएमएस, आणि संपूर्ण देशातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. दरम्यान, युजर्सला हा डेटा कोणत्याही अटीशिवाय तसेच डेली लिमिटशिवाय मिळतो. युजर हा डेटा एका दिवसांत वापरू शकतो अथवा संपूर्ण वर्षभर वापरू शकतो.

जर ६०० जीबी डेटा ३६५ दिवसांमध्ये विभागल्यास दिवसाला १.६४ जीबी डेटा मिळतो. १९९९ रूपये १२ महिन्यांनी भागल्यास १६६.५८ रूपये होतात. याचा अर्थ या प्लानमध्ये युजर्सला केवळ १६६ रूपयांमध्ये दिवसाला १.५ जीबीपेक्षा अधिक डेटा १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -