मुंबई: आचार्य चाणक्य यांच्यामते जीवनात जर विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आचार्य चाणक्य यांच्या मते जर विद्यार्थी जीवनात या गोष्टी पाळत असेल तर तो नेहमी कामात यशस्वी होईल.
विद्यार्थ्यांनी कधीही आळस करू नये. जीवात आळस केला नाही पाहिजे. आळस सर्व काही खराब करते.
आचार्य चाणक्य म्हणतात की जे विद्यार्थी जीवनात आळस करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा कधीही अपमान करू नये. असे करणे चुकीचे आहे.
गुरू आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी योग्य मार्ग दाखवतात. अशातच त्यांचा अपमान करणारे कधीही आनंदी राहत नाहीत.
विद्यार्थ्यांनी जीवनात कधीही लालची बनू नये. लोभ माणसाला यशापासून दूर नेतो.
ज्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नसतो ती व्यक्ती नेहमी इमानदारीने तसेच जीवनात खूप प्रगती करते.