मुंबई: डायबिटीज(diabetes) रुग्णांसाठी सतत शुगर लेव्हलची चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र योग्य वेळेस चाचणी केल्यास योग्य रिझल्ट मिळतात. मात्र सवाल असा आहे की डायबिटीजची टेस्ट सकाळी, संध्याकाळी की रात्री केली पाहिजे? जाणून घेऊया टेस्ट करण्याची योग्य वेळ कोणती…
डायबिटीज हा असा आजार आहे ज्यात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राखणे अतिशय गरजेचे असते. याची योग्य वेळेस टेस्ट करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे योग्य रिझल्ट मिळतात. मात्र ही टेस्ट कधी करावी याबाबत विस्ताराने जाणून घेऊया…
सकाळची टेस्ट
अधिकतर डॉक्टर डायबिटीज रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. याला फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट म्हटले जाते. या टेस्टसाठी तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर ८ ते १० तास काही खाल्ले नाही पाहिजे. सकाळची टेस्ट यासाठी गरजेची आहे कारण यामुळे आपल्या शरीरात शुगरची बेसिक स्थिती दिसते.
जेवणानंतरची टेस्ट
जेवल्यानंतर दोन तासांनी केलेल्या ब्लड शुगर टेस्टला पोस्टप्रेंडियम ब्लड शुगर टेस्ट म्हटले जाते. यावरून खाल्ल्यानंतर शुगर लेव्हल कशी वाढते हे ही टेस्ट दाखवते. तसेच तुमचे शरीर जेवण किती चांगल्या पद्धतीने प्रोसेस करत आहे आणि औषधे किती परिणामकारक ठरत आहेत हे यावरून समजते.
संध्याकाळी आणि रात्री टेस्ट
संध्याकाळी आणि रात्री केली जाणारी टेस्टमुळे संपूर्ण दिवसभरात तुमची शुगर लेव्हल किती वर-खाली होते. हे दाखवते. जर तुम्हाला दिवसभराची स्थिती जाणून घ्यायची असेल तर यावेळेस टेस्ट करणे फायदेशीर ठरते.
योग्य वेळ काय आहे?
जर तुम्ही नियमितपणे शुगर लेव्हल तपासत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी टेस्ट करणे चांगले असते. यावरून तुम्हाला समजते की न खाता तुमची शुगर लेव्हल किती आहे. जर डॉक्टरने सल्ला दिल्यास तुम्ही दिवसभरात काही खास वेळेस ही टेस्ट करू शकता.
टेस्ट करण्याआधी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुमच्या शुगर लेव्हलमध्ये असामान्य बदल दिसले तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा.
नियमितपणे टेस्ट करत राहा. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहील.