मुंबई: मान्सूनच्या दिवसात आजारांचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. अनेकदा इन्फेक्शन होण्याची भीती असते. मान्सूनच्या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर आजारांचा धोका अधिक वाढतो.
पावसाळ्यात पाण्यातून पसरणे आजार, फूड पॉईजनिंगचा धोका होण्याची शक्यता अधिक असते. काही भाज्यांच्या सेवनानेही तुम्ही आजारी पडू शकता.
पावसाळ्याच्या दिवसांत हिरव्या पालेभाज्या कमी खाव्यात. यात आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया वाढतात.
कोबी, फ्लॉवर, ब्रोकलीमध्ये आर्द्रतेमुळे अधिक बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असतो.
गाजर, बीट, शलगममध्ये मातीमुळे आर्द्रता अधिक असते. यामुळे या भाज्या लवकर खराब होतात.
आर्द्रतेमुळे मशरूममध्ये फंगस तसेच बॅक्टेरियाची वाढ अधिक होते. त्यामुळे हे पावसाळ्यात नखाल्लेलेच बरे.
वांग्यांमध्ये आर्द्रतेमुळे फंगस, बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात. अशातच वांग्याचे सेवन करणे टाळावे.
मोड आलेली कडधान्ये जरा बेतानेच खावीत. कारण ओलाव्यामुळे यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.