मुंबई: १६ ऑगस्टचा दिवस सिंह राशीसाठी अतिशय खास असणार आहे. सूर्य लवकरच या राशीत गोचर करणार आहे. सूर्याचे गोचर या मूलांकाच्या व्यक्तीसाठी नशीब बदलणारी ठरणार आहे.
जर तुमचा जन्म एखाद्या महिन्याच्या १, १०, १९ अथवा २८ तारखेला झाला आहे तर तुमचा मूलांक १ आहे. या मूलांकाच्या लोकांसाठी १६ ऑगस्टनंतर चांगले दिवस सुरू होणार आहेत.
१६ ऑगस्टचा दिवस विशेष आहे. १६ ऑगस्ट २०२४ शुक्रवारचा दिवस सूर्य आपल्या राशीत परिवर्तन करत आहे. सूर्याचे हे गोचर आपल्या स्वराशीत होत आहे. सूर्य या दिवशी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश केल्याने ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे. त्यांचा भाग्योदय होऊ शकतो. मूलांक १चा स्वामी सूर्य आहे. सूर्याचे या मूलांकाशी नाते आहे.
सूर्य देवाच्या या प्रिय मूलांकाला १६ ऑगस्टनंतर बिझनेसमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. यांच्याकडे पैशाचे स्त्रोत वाढतील. तसेच तुमची स्वप्ने पूर्ण होतील.
हा मूलांक असलेल्यांसाठी सूर्याचे गोचर लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल.शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे.
सूर्य आपले राशी परिवर्तन दर ३० दिवसांमध्ये करतो मात्र यावेळी सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश मूलांक १, १०, १९ आणि २८ला जन्मलेल्या लोकांसाठी शुभदायक ठरू शकते.