Monday, February 10, 2025
Homeक्रीडाविनेश फोगाटची प्रतीक्षा आणखी वाढली, या दिवशी येणार निर्णय

विनेश फोगाटची प्रतीक्षा आणखी वाढली, या दिवशी येणार निर्णय

मुंबई: विनेश फोगाटला रौप्य पदकासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विनेशला पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सुवर्णपदकाच्या सामन्याआधी अपात्र ठरवण्यात आले होते. भारतीय कुस्तीपटू विनेशने याबाबत सीएएसकडे अपील केली होती. याचा निर्णय मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येणार होता. मात्र आता हा निर्णय १६ ऑगस्टला होईल.

खरंतर, विनेशने रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सकडे अपील केले होते. सीएएसने याबाबतीत ९ ऑगस्टला सुनावणी केली होती. या दरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघाचे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी विनेशची बाजू राखली होती. विनेशला वजन वाढल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. तिचे वजन १०० ग्रॅम अधिक आढळले होते. आता विनेशने रौप्य पदकाची मागणी केली आहे.

हे आहे प्रकरण

विनेश पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये ५० किलो वजनी गटात खेळत होती. तिने दमदार कामगिरीच्या जोरावर रौप्य पदक पक्के केले होते. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्याआधी तिला अपात्र ठरवण्यात आले होते. विनेशचे वजन केवळ १०० ग्रॅम अधिक होते. तिने आपले वनज कमी करण्यासाठी रात्रभर मेहनत घेतली होती. इतकं की केसही कापले होते. मात्र तरीही १०० ग्रॅम वजन अधिक भरले.

विनेशचा ऑलिम्पिकमध्ये दम

विनेशने सेमीफायनलमध्ये क्युबाची कुस्तीपटू गुजमान लोपेजीला हरवले होते. तर क्वार्टरफायनलमध्ये युक्रेनची ओकसाना लिवाचला हरवले होते. विनेशने प्री क्वार्टरफायनलमध्ये जपानची सुसाकीला हरवले होते. मात्र सुवर्णपदकाच्या लढतीआधी अपात्र ठरवण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -