२१ हजार राख्या अमेरिकेत पाठविल्या
पेण : आई डे केअर संस्था संचलित दिव्यांग मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र, रामवाडी, पेण- रायगड येथील दिव्यांग मुलांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावर ही भर दिला जातो आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचे शिक्षण दिले जाते. आता रक्षाबंधनाच्या या आनंददायी सणानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांनी जवळजवळ 21 हजार राख्या तयार केल्या असून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी अनेक कंपन्यांनी तसेच संस्थेच्या विश्वस्तांनी विविध ठिकाणी विक्री केंद्र लावण्याच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली.
संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. शिल्पा ठाकूर यांनी आपल्या मैत्रिणींबरोबरच अमेरिकेत सुद्धा या मुलांनी बनविलेले राख्या व ईतर वस्तु पाठविल्या आहेत. संजय ठाकूर, संतोष चव्हाण, नितीन राजेशिर्के यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू घेण्यासाठी आपल्या मित्रांना तसेच परिचितांना प्रवृत्त केले. आपल्या राहण्याच्या ठिकाणी विक्री केंद्र ही उपलब्ध करून दिले. संस्थेचे सचिव ऍड सतीश म्हात्रे यांनी संस्थेतील राख्यांचे साहित्य कोर्टात नेऊन विक्री सुद्धा केले आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील यांनी स्वतः जाऊन पुण्यापर्यंत स्टॉल लावलेले आहेत. डॉक्टर समिधा, गांधी, वंदना पवार, मनोज मेस्त्री, अविनाश ओक, संतोष बहिरा सुनिता चव्हाण,वर्धा कुलकर्णी या सर्व लोकांच्या मेहनती बरोबरच संस्थेतील विद्यार्थी रत्नाकर, वैभव, चेतन, मानसी,योगिता, नंदा, निकिता, अनिकेत,आदित्य, अर्जुन, उमर आणि कर्णबधिर क्राफ्ट मदतनीस स्वाती, अमृता,हर्षदा, सायली, सुप्रिया, शिक्षक ज्योत्स्ना वारगुडे, प्रतिभा मोकल.
अक्षता देवळे आणि इतर कर्मचारी वृद्ध यांनी अतिशय मेहनत घेतली असुन या सर्वांच्या मेहनतीमुळेच या मुलांना सहा हजार रुपया पर्यंत मानधन देण्यात आले आहे. या मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदी कराव्यात यातून मिळालेल्या नफ्यातून आपण आपल्या मुलांना अगदी दहा हजार रुपये पर्यंत मानधन देऊ शकतो. असा विश्वास अध्यक्ष प्रेमलता पाटील आणि संस्थापिका स्वाती मोहिते, व्यावसायिक युनिटच्या इन्चार्ज विद्या खराडे यांनी व्यक्त केला.