Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray : राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर!

Raj Thackeray : राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर!

‘असा’ असेल विदर्भ दौरा

अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता आगामी विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

मनसे आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) ही स्वबळावर लढवणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केला. यानंतर आता मनसे अध्यक्ष विदर्भ दौरा करणार आहे. मराठवाड्यानंतर राज ठाकरे हे २० ऑगस्टपासून विदर्भाच्या दौरावर असणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यानंतर आता विदर्भात या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे. २८ ऑगस्टला राज ठाकरे हे अकोला दौऱ्यावर येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी पक्ष संघटना ताकदीने कामाला लागल्या आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मागे नाही. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा मनसेकडून देण्यात आला होता. आता आगामी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याचा नारा मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच मतदारसंघावर मनसेकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांचा नुकताच मराठवाडा दौरा पार पडला. हा दौरा चांगलाच गाजला. या दौऱ्यादरम्यान आमदार अमोल मिटकरींची गाडी फोडण्याची घटना असेल किंवा धाराशिव मध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या विरोधात केलेली घोषणाबाजी. तसेच त्यानंतर बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेको आंदोलन. राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेले प्रेस कॉन्फरन्स आणि दौऱ्यानिमित्ताने काही लोकांनी केलेले आंदोलन यामुळे राज ठाकरे यांचा दौरा चांगलाच गाजला. त्यामुळे आता आगामी विदर्भ दौऱ्यात देखील काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

असा असेल विदर्भ दौरा !

राज ठाकरे यांच्या विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात ही २० ऑगस्टपासून राज्याची उपराजधानी नागपूर पासून असणार आहे. २१ ऑगस्ट रोजी नागपूर मधील मतदारसंघ निहाय्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर २२ ऑगस्ट रोजी नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया येथे निरीक्षक व पदाधिकारी यांचे बैठक राज ठाकरे घेणार आहेत. २३ ऑगस्टला राज ठाकरे हे गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर येथे असतील ते निरीक्षक पदाधिकारी यांच्या बैठकीला मार्गदर्शन करतील तर २४ ऑगस्टला वणी ते वर्धा असा दौरा असेल. तसेच २५ ऑगस्ट ला अमरावती ते वाशिम असा दौरा राज ठाकरे करतील. तर २६, २७ ऑगस्टला अकोला बुलढाणा असा हा दौरा असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -