मुंबई: खाजगी कंपन्यांचे रिचार्ज प्लान महाग झाल्यानंतर आता BSNL बाजारात पुनरागमन करत आहे. BSNL सातत्याने स्वस्त प्लान लाँच करत आहे. एक महिन्याच्या आत कोट्यावधी लोकांनी BSNLमध्ये आपला नंबर पोर्ट केला आहे. BSNLचे प्लान खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. दरम्यान, ४जी लाँच केल्यानंतर बीएसएनएलचे कव्हरेजही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत चांगले होण्याची आशा आहे.
यातच बीएसएनएलने असा प्लान लाँच केला आहे की यात एक रूपयाला एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानसोबत डेटाही मिळतो. जाणून घेऊया या प्लानबद्दल…
BSNLने सादर केला ९१ रूपयांचा प्लान
BSNLचा १०० रूपयांच्या आतील प्लान जबरदस्त आहे. यातच कंपनीने ९१ रूपयांचा आणखी एक प्लान सादर केला आहे. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. खास बाब म्हणजे केवळ १ रूपयांत एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळते. बीएसएनएलचा हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे. या प्लानअंतर्गत १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येते. सोबतच ११ पैसे दराने १ एमबी डेटा मिळेल.
१०७ रूपयांच्या प्लानमध्ये मिळणार हे फायदे
बीएसएनएलकडे १०७ रूपयांचा प्लान आहे. यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग नाही तर सर्व नेटवर्कवर २०० मिनिटचे कॉलिंगचे फायदे मिळतात. सोबतच या प्लानमध्ये ३५ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो.