Friday, March 28, 2025
HomeदेशKolkata Rape-Murder Case: कोलकाता बलात्कार-हत्या विरोधी देशभरातील ओपीडी सर्व्हिस आजही बंद, देशभरात...

Kolkata Rape-Murder Case: कोलकाता बलात्कार-हत्या विरोधी देशभरातील ओपीडी सर्व्हिस आजही बंद, देशभरात संपाची हाक

नवी दिल्ली: फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने मंगळवारी १३ ऑगस्टला देशव्यापी विरोध आणि ओपीडी तसेच वैकल्पिक सेवांना बंद करण्याचे आवाहन केले आहे. हा विरोधा ९ ऑगस्टला कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका महिला प्रशिक्षक डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आहे.

FAIMAने एक्सवर पोस्ट करत लिहिले, आम्ही संपूर्ण भारतात विरोध करणाऱ्या डॉक्टरांसोबत आहोत. आम्ही संपूर्ण देशातील डॉक्टरांना आजपासून या विरोधामध्ये सामील होण्याचे आवाहन करतो. आम्हाला न्याय हवा आङे.

यातच इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहून महिला डॉक्टरसोबत झालेल्या कृत्याबाबत तात्काळ कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. आयएमएने या प्रकरणी निष्पक्ष आणि खोलवर तपासाची मागणी केली आहे.

IMAने तत्काळ सुधारणाची आवश्यकता असल्याच्या मागणीवर जोर देत कामाच्या ठिकाणी डॉक्टर्स, विशेषकरून महिला सुरक्षा वाढवण्याची आवश्यक पावले उचलण्यात यावी अश मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

कोलकातामध्ये शुक्रवारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला. सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ड्युटीवर तैनात असलेल्या ३१ वर्षीय पोस्टग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरसोबत गुरूवारी रात्री कथितपणे बलात्कार करण्यात आला तसेच तिची हत्या करण्यात आली. अधिकाऱ्यांनी चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या ट्रेनी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या.

वाढत्या जनआक्रोशादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले की पोलिसांनी हे प्रकरण रविवारपर्यंत सोडवले नाही तर हे प्रकरण सीबीआयला सोपवले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -