मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. मात्र आता या मालिकेत महत्त्वाचा बदल झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयने सांगितले की भारत-बांग्लादेश यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आता धरमशालामध्ये खेळवला जाणार नाही. याचे आयोजन ग्वालियरमध्ये होईल.
ग्वालियरमध्ये नुकतेच नवे क्रिकेट स्टेडियम बनून तयार झाले आहे. बीसीसीआयने भारत-इंग्लंड मालिकेतही बदल केला आहे. खरंतर, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना ६ ऑक्टोबरला धरमशालामध्ये खेळवला जाणार होता. मात्र येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे. याच कारणामुळे पहिला टी-२० सामना ग्वालियरमध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. ग्वालियरमध्ये श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियम बनून तयार झाला आहे. हे या शहरातील नवे स्टेडियम आहे.
दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळणार बांगलादेशचा संघ
भारत-बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये आणि दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाईल. टी-२० मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये ६ ऑक्टोबरला खेळवला जाईल. तर दुसरा सामना दिल्ली आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल
भारत-इंग्लंड वेळापत्रकात बदल
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतही बदल झाला आहे. खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२५मध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. येथे ते पाच टी-२- आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २२ जानेवारी आणि दुसरा २५ जानेवारीला खेळवला जाणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि दुसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. मात्र आता दोन्ही जागा बदलण्यात आल्या आहेत. आता पहिला सामना कोलकाता आणि दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल.