Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीउत्सुकता जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सनी लिओनीच्या 'कोटेशन गँग'ची!

उत्सुकता जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सनी लिओनीच्या ‘कोटेशन गँग’ची!

मुंबई : सनी लिओनी स्टारर ‘कोटेशन गँग’ (Quotation Gang) ३० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या तयारीत असल्याने चाहत्यांना या बद्दल उत्सुकता आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट सनीची एक वेगळी बाजू दाखवणार यात शंका नाही. सनी लिओनीच्या कामगिरीची वाट पाहत असताना प्रेक्षकांनी म्हटले आहे की, “सनी फक्त अभिनय करत नाही तर ती फक्त त्या व्यक्तिरेखेत जगत आहे” तसेच ‘कोटेशन गँग’ सारखी भूमिका निवडल्याबद्दल अनेकांनी सनीचे कौतुक केले.

‘कोटेशन गँग’ मध्ये सनी पद्माची आकर्षक भूमिका साकारणार आहे जी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच लक्षणीय चर्चा घडवून आणली आहे. ‘कोटेशन गँग’ हा सनीच्या अष्टपैलुत्वाचा आणि चित्रपटांमध्ये काळजीपूर्वक निवड करण्याच्या तिच्या संवेदनशीलतेचा खरा-पुरावा आहे.

यापूर्वी सनी लिओनीने तिला चित्रपटात अशी भूमिका दिल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांचे आभार मानले होते. ‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये जॅकी श्रॉफ आणि प्रियामणी देखील आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -