Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीBank Job : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! SBIमध्ये १०००हून अधिक पदांची मेगाभरती

Bank Job : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! SBIमध्ये १०००हून अधिक पदांची मेगाभरती

मुंबई : बँकेत काम (Bank Job) करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नुकतेच भरतीची अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार बँकेत तब्बल १ हजार ३० पदांची भरती घेण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवार एसबीआयच्या https://sbi.co.in/web/careers/current-openings या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. तर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र आणि इच्छुकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

या भरती मोहिमेद्वारे, बँक व्हीपी वेल्थ रेग्युलरच्या ६०० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम रेग्युलरच्या १५० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम बॅकलॉगच्या १२३ जागा, व्हीपी वेल्थ बॅकलॉगच्या ४३ जागा, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट रेग्युलरच्या ३० जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर बॅकलॉगच्या २६ जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर रेग्युलरच्या २३ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड रेग्युलरच्या ११ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड बॅकलॉगच्या ११ जागा भरल्या जातील.

त्याचबरोबर रिजनल हेड बॅकलॉगच्या ४ जागा, रिजनल हेड रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड) रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) रेग्युलर व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) रेग्युलरसाठी प्रत्येकी २ जागांची भरती केली जाणार आहेत. तसेच, मोहिमेद्वारे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर रेग्युलरसाठी एक जागा भरली जाईल.

अर्ज शुल्क

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, SC, ST आणि अपंग उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -