Wednesday, July 9, 2025

Share Market: या आठवड्यात शेअर मार्केट ३ दिवस राहणार बंद, या कारणामुळे सुट्टी

Share Market: या आठवड्यात शेअर मार्केट ३ दिवस राहणार बंद, या कारणामुळे सुट्टी
मुंबई: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या आठवड्यात शेअर मार्केटला तीन दिवसांची सुट्टी असणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीशिवाय या आठवड्यात आणखी एक दिवस बाजार बंद असणार आहे.

ऑगस्ट महिना हा सणांचा महिना असतो. त्यामुळे विविध सण या महिन्यात येतात. अशातच या आठवड्यात स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे बँका तसेच शेअर बाजारातही सुट्टी असणार आहे.

१५ ऑगस्टला बंद मार्केट


या आठवड्यात गुरूवारी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. अशातच संपूर्ण देशात या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने सुट्टी असेल. बँका आणि शाळांसोबत शेअर मार्केटही बंद असेल. स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्केट बंद असल्याकारणाने इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव, एसएलबी, करेन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरव्हेटिव्हा मार्केट बंद असेल.

या दिवशी शेअर मार्केट बंद


१५ ऑगस्ट गुरूवार- स्वातंत्र्य दिन

१७ ऑगस्ट शनिवार- साप्ताहिक सुट्टी

१८ ऑगस्ट रविवार - साप्ताहिक सुट्टी
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा