Sunday, October 19, 2025
Happy Diwali

Nitesh Rane : सुपा-या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून तर तमाशातला नाच्या पहिला सिल्वर ओकवर आता दिल्लीत नाचतोय!

Nitesh Rane : सुपा-या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून तर तमाशातला नाच्या पहिला सिल्वर ओकवर आता दिल्लीत नाचतोय!

भाजपा आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल!

मुंबई : मातोश्री बाहेर आलेले मुसलमान शिंदेची माणसं होती, अशी वल्गना करणा-या संजय राऊतसह उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, जो बाळासाहेबांचा झाला नाही तो त्या मुस्लिमांचा काय होणार. ज्यांच्या मतांवर त्यांचे नऊ खासदार निवडून आले त्यांनी वक्फ बोर्डाच्या वेळी संसदेतून पळ का काढला याचे मुसलमान समाजाला संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी मशिदीमध्ये जाऊन उत्तर द्यावे. राजारामचे रक्त असेल तर समोर जा, घाबरतो कशाला? असे जाहीर आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी लाचार झालेत. ते मतांसाठी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत आहेत. आणि जेव्हा त्यांच्यासाठी काही करायची वेळ येते तेव्हा हे पळ काढतात. मनसे कार्यकर्ते यांना योग्य बोलले 'हिजडा'. पण 'ते' सुद्धा स्वाभिमानी आहेत. लाचारी करत नाही, असा उपरोधिक टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले की, दोन महिन्यानंतर अॅक्शन होणार आहे. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, हो नक्कीच ह्यांच्यावर अॅक्शन होणार आहे आणि त्यांची रिअॅक्शन करेपर्यंत हे जेलमध्ये असतील. तू आणि तुझा आदित्य रेंज मध्ये आहे. स्वतःचा पहिला जीव वाचव, मग अॅक्शनी भाषा कर, असा चिमटाही नितेश राणे यांनी काढला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी टाकणारे कार्यकर्ते हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून आलेले होते. वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे. वसुलीचा बादशाह मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसला आहे. आम्हाला पण तमाशाच्या शोची तिकीट पाहिजे. राऊत तमाशा वालाच आहे. हा नाच्या पहिला सिल्वर ओक वर होता. आता तो दिल्लीत नाचतोय, असा हल्लाबोल करत नितेश राणे यांनी अक्षरश: दोघांचेही वाभाडे काढले.

Comments
Add Comment