मुंबई: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मोठे महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार यात लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. घरातील पुजेदरम्यान तुळशीपत्रांना मानाचे स्थान असते. घरासमोरही अंगणात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. त्याचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच तुळशीच्या रोपाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यामुळे पर्यावरणात चांगली हवा राहण्यास मदत होते. तुळस ही औषधीही असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते.
त्यामुळे तुळशीची पाने तोडताना काही गोष्टींची काळजी जरूर घेतली पाहिजे. पाहा काय काळजी घ्यावी…
सूर्य मावळल्यानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळेस तुळशीला स्पर्श करू नये.
तुळशीची पाने कधीही नखाने तोडू नयेत.
आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला हात लावू नये. तुळशीची पाने तोडू नयेत.
सूर्यग्रहण असल्यास चंद्रग्रहण असल्यास तसेच एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.