Tuesday, March 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : पोलीस भरतीत सगळे मुस्लिम, मराठ्यांसाठी घातक! जरांगेंच्या आंदोलनाची भाजपा आमदार...

Nitesh Rane : पोलीस भरतीत सगळे मुस्लिम, मराठ्यांसाठी घातक! जरांगेंच्या आंदोलनाची भाजपा आमदार नितेश राणेंनी केली ‘पोलखोल’

मुंबई : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आम्ही राज्याच्या कानाकोप-यात फिरलो. मात्र आज चार-पाच टाळक्यांना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठ्यांच्या नावाखाली मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

तुमच्या आंदोलनाचा मराठा समाजाच्या लोकांना किती फायदा मिळतो आहे. किती मराठी मुलांना नोक-या मिळत आहेत, असा सवालही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत जर सगळे मुस्लिम असतील तर ते मराठा समाजासाठी घातक आहे. यावर आम्ही बोलणारच असे ठणकावून सांगताना भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत पोलीस भरतीची यादीच वाचून दाखवली. या यादीत सर्व मुस्लिम मुलांची नावे असल्याने जरांगेंच्या आंदोलनाची नितेश राणे यांनी ‘पोलखोल’ केली.

दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांना मोहम्मद अली जिनाची उपमा दिली तेव्हा महाविकास आघाडीतील आणि त्याला समर्थन करणाऱ्या ब्रिगेडी लोकांना फार झोंबले. पण या उपमा देण्यामागे काही कारणे आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहोत की, आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. आम्ही पण मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी राज्याच्या कानाकोप-यात फिरलेलो आहोत. पण आज जरांगे पाटील यांची भाषा एका राजकीय नेत्यांची आहे. ते फक्त भाजपावर टीका करत आहेत. महाविकास आघाडीवर टीका करत नाही. ते भाजपा नेत्यांवर बोलतात तसे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर बोलत नाहीत. म्हणूनच ज्या जिनाने हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडली तीच भूमिका जरांगे पाटील घेत असतील तर आमचा त्याला विरोध आहे. मराठा समाजाच्या हिताचे बोलाल तर समर्थन देऊ. मात्र राजकीय भाषा करत असाल तर विरोधच असेल आणि तुम्हाला राजकीय भाषेतच सडेतोड उत्तर देऊ, असे नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी आर्थिक मागास विभाग (इडब्ल्यूएस) अंतर्गत पोलीस भरतीची यादीमधील नावे नितेश राणे यांनी वाचून दाखवली. यात सगळी मुस्लिम मुलांची नावे असल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या यादीत जफर शेख, अफजल पठाण, मुशरफ सय्यद, फारुख शेख, फहीम, फिरोज पठाण, अस्लम शेख, अहमद शेख, आसमा शेख, सय्यद शेख, सय्यद सय्यद, नसीम शेख, शेखर शेख, करिश्मा शेख, जीशान फारुखी आणि तरुन्नुम शेख याच्यात कोण मराठा आहे. बीड मध्ये झालेल्या पोलीस भरतीत सगळे मुस्लिम मुलं असल्याचे यावेळी नितेश राणे यांनी सांगितले.

मी जर फडणवीस साहेबांची चप्पल तर तुम्ही महाविकास आघाडीची चड्डी!

तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठ्यांना होत नाही. मग हा विषय आम्ही बाहेर काढला आणि तुम्हाला मोहम्मद अली जिनाची उपमा दिली तर मग आमच्यावर राजकीय टीका का करताय? मी जर फडणवीस साहेबांची चप्पल असेन तर तुम्ही महाविकास आघाडीची चड्डी बनून फिरताय, असे बोलले तर चालेल? यांच्या शांतता रॅलीत जावेद भाई शेख पाणी वाटत आहे. ह्यांची शांतता रॅली मुसलमान समाजाने हायजॅक केली आहे का? पाणी पण त्यांचे. मुद्दे पण त्यांचेच.. मी तर म्हणतो, त्यांच्या शांतता रॅलीत मराठा किती आहेत ते तपासला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.

मराठा समाजाची बदमानी का?

आम्हाला विरोध करणारे मराठा समाजाचे नाहीत. जरांगे सोबत चार-पाच टोळके सोडले तर सगळे मुस्लिमांनी हायजॅक केले आहे. मराठा समाजाने हे लक्षात घ्यावे. अन्यथा हे ओबीसी आणि मराठा वादात गुंतून ठेवतील. तसेच जे आम्हाला साडेसात नंतर फोन करत आहेत त्यांनी देखिल हे लक्षात ठेवावे की, तुमच्या नेत्यांचे देखील फोन नंबर आमच्याकडे आहेत.

तुम्ही एक फोन कराल तर तुमच्या नेत्यांना… उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोले यांना आमचे चार फोन जातील. आमचे कार्यकर्तेही शिव्या-शाप देतील, अरे ला का रे करतील, मग आम्हाला दोष द्यायचा नाही, असेही नितेश राणे यांनी बजावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -