मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आपल्या घरी शानदार कार घेऊन आला आहे. मोहम्मद सिराजच्या या नव्या लक्झरी गाडीची किंमत कोट्यावधीमध्ये आहे. सिराजने सेंटोरिनी ब्लॅक रंगाची रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. सिराज या कारची ऑटोबायोग्राफी लाँग व्हील बेस मॉडेल आपल्या घरी घेऊन आला आहे. सिराजने आपल्या नव्या कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिराजच्या लक्झरी कारची किंमत?
भारतीय बाजारात रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWBच्या एक्स शोरूम प्राईस २.३९ कोटी रूपये आहे. या कारला कस्टमाईज करता येते. यानंतर या लक्झरी कारच्या किंमतीत बदल पाहायला मिळू शकतात. ही कार ३.० लीटर डिझेल इंजिन आणि ३.० लीटर पेट्रोल इंजिन या दोन्ही व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडलेले आहे.
View this post on Instagram
रेंज रोव्हर्सचे फीचर्स
ऑटोमेकर्स लँड रोव्हरची रेंज रोव्हर हाय प्राईस टॅगवाली कार आहे. ही कार ऑल व्हील ड्राईव्हसाठी ओळखली जाते. या कारला अनेक ड्रायव्हिंग मोड्समध्ये चालवले जाऊ शकते. या एसयूव्हीला हीट आणि कूल २४ पद्धतीने केले जाऊ शकते. या गाडीमध्ये रेयर व्यू मिरर, एक डोमेस्टिक प्लग सॉकेट आणि एक पॉवर्ड जेस्चर टेलगेल लावण्यात आला आहे.