पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा ८ ते १० दिवस अगोदर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून दरवर्षी परीक्षेच्या तारखा ५ ते ६ महिने अगोदर जाहीर केल्या जातात. त्यानुसार फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये आयोजित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया वेळेत होण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तयारीला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी यंदापासून दोन्ही परीक्षा ८-१० दिवस लवकर होत आहेत. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. २४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. या संभाव्य वेळापत्रकावर सूचना, हरकती मांडण्यासाठी दि. २३ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर या सूचना पाठवायच्या आहेत. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाहीत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…