Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजअभ्यास लक्षात राहावा म्हणून या युक्त्या...

अभ्यास लक्षात राहावा म्हणून या युक्त्या…

अभ्यास लक्षात राहण्यासाठी फक्त हुशारी अवलंबून नसते, तर प्रभावी ज्ञान प्राप्त करणे आणि ते लक्षात ठेवणे, मनात धरून ठेवणे यावर अभ्यासातील यश ठरते. अभ्यास लक्षात राहण्यासाठी कथाकथन, अभ्यासातील गोष्टी प्रात्याक्षिकपणे करणे, सांगितिक स्मरणशक्ती, स्मृतिप्रणाली, स्मृतिचिकित्सा, पीईजी पद्धत अशा विविध पद्धतींचा वापर करून मुले अधिक प्रभावी होतील.

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

मुलांनी परीक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी, सर्वोच्च यश मिळवावे याचे मुलांवर खूप प्रेशर असते. पण अभ्यासातील यश हे फक्त हुशारीवर अवलंबून नसते तर प्रभावी ज्ञान प्राप्त करणे आणि ते लक्षात ठेवणे, मनात धरून ठेवणे यावर ठरते. स्मरणशक्तीच्या विकासात फोटोग्राफिक मेमरी वाढवत राहणे ही एक इंटरेस्टिंग गोष्ट असते. माहितीला मनात आकृत्यांमध्ये ट्रान्सफॉर्मर करणे हे यात अपेक्षित असते. ज्या कन्सेप्ट्स गुंतागुंतीच्या असतात त्या गोष्टींना व्हिज्युअलाईज करणे, ऑर्गनाईज करून आठवणे हे अभिप्रेत असते. याचा उपयोग कसा करता येईल तर…
मुलांना अभ्यासात यश मिळावे म्हणून…

  • मुलांच्या झोपेला प्राधान्य द्या. मुलांना शांत, गाढ झोप मिळाल्यास मेंदू ताजातवाना, टवटवीत होतो. रिसेप्टिव्ह राहतो. शिकणे प्रभावी होते. अभ्यासाचे ठसे स्पष्ट आणि टिकाऊ होतात. मेमरी कन्सोलिडेशन होते. मेंदूला छान विश्रांती मिळाली की तो मिळालेल्या माहितीला इनकोड करू शकतो आणि रिटेन करायला पूर्ण तयार होतो. परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी रिकॉल करतो.
  • कथाकथन गुंतागुंतीच्या अभ्यास विषयांची छोट्या छोट्या जमतील अशा तुकड्यात विभागणी करायची आणि मग त्याला गोष्टी रूप पद्धतीने गुंफायचं. हे टेक्निक इतिहास, भाषा विषयात उपयुक्त ठरते.
  • गोष्टी प्रात्यक्षिक पद्धतीने केल्यास मुलांची समजशक्ती वाढते. दैनंदिन जीवनातील गोष्टी कशा कराव्या याबद्दलच्या संकल्पना मजबूत करण्यासाठी प्रॅक्टिकल सराव फार परिणामकारक ठरतो. कारण जेव्हा मुले स्वतः ती गोष्ट करून पाहतात, अनुभवतात तेव्हा त्या गोष्टीचे आकलन चांगले होते.
  • माईंड मॅप्स् कन्सेप्ट्सचे आकलन होण्यासाठी आणि त्याचा पुनर्विचार करण्यासाठी माईंड मॅप्स् हे अतिशय मौल्यवान असे साधन आहे. ही जी विस्तृत माहिती आहे, तिचे फ्लोचार्टमध्ये रूपांतर करण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरते. एखाद्या टॉपिकमधील मुद्द्यांचे मनात जणू नकाशे तयार करणे आणि मग ते स्वतः नकाशे तयार केल्याने विषय वस्तूंचे आकलन चांगले होते.
  • सांगीतिक स्मरणशक्ती जी मुले सृजनशील असतात अशा मुलांसाठी संगीत स्मृती हे खूप युनिक सोल्युशन आहे. माहितीचे आकर्षक संगीतात रूपांतर, गाणी, रॅप तयार करून त्यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती आठवायला हे टेक्निक अतिशय चांगली मदत करते.
  • मेमोनिक डिव्हाइस म्हणजे स्मृतीप्रणाली नक्की काय आहे हे टेक्निक?
    तर एक सलग असे वाक्य किंवा ओळ तयार करायची ज्याच्या मदतीने काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवता येतात.
    उदा. सोलर सिस्टीम लक्षात ठेवण्यासाठी My Very Excellent Mother Just Served Us Nachos.
    Mars, Earth, Mercury, Jupiter, Saturn, Uranus, Neptune
  • प्रभावी अध्ययन करण्यासाठी माहितीचे छोटे छोटे ग्रुप तयार केल्याने स्मरणशक्ती वाढते. पुन्हा आठवणे सोपे जाते. फोन नंबर, क्रेडिट कार्ड नंबर लक्षात ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. अगदी तसेच हे टेक्निक परीक्षेसाठी अभ्यास करताना उपयोगी ठरते.
  • स्मृतिचिकित्सा नेमॉनिक्स स्ट्रॅटेजीस् वापरून अभ्यास आणखी इंटरेस्टिंग करता येतो. याला ‘जर्नी मेथड’ म्हणता येईल. ज्या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत त्याची पूर्ण माहिती घेणे. तिथे गेल्यानंतर तिथल्या स्थळांचे तपशील, छायाचित्र काढणे. घरी गेल्यावर त्या स्थळाचे डोळे मिटून व्हिज्युअलाईजेशन करणे. या टेक्निकमध्ये जर एकेक स्टेप्स वापरल्या तर ते स्थळ तुम्ही टप्प्याटप्प्याने आठवू शकता.
  • पीईजी पद्धत ज्याला आपण नंबर्सचा सिक्वेन्स अर्थात क्रम म्हणून या. उदाहरणार्थ. तुमच्या घरासमोरचा जिना, गाडीचे मेकिंग, डोळ्यांसमोर आणा, त्याची दिशा, किती पायऱ्या आहेत. असाईन मेमोरेबल इमेजेस. प्रत्येक नंबर लक्षात ठेवण्यासाठी एक इमेज त्याच्याशी जोडून घेतली तर तो क्रम लक्षात राहतो. आकृतीशी माहिती जोडा. ऐतिहासिक घटनांची चित्रे पाहिली की, क्रमवार तपशील आठवायला लागतात.

एक अतिशय निराळेच टेक्निक मुलांना एक्साईटमेंट देऊ शकते. मुलांना स्वतःच स्वतःला ‘चॅलेंज’ घ्यायला शिकवा. चॅलेंज घेण्याची सवय मुलांना मोटिव्हेट करते. मुले स्वतःच्या क्षमता तपासून पाहू शकतात. अभ्यास करताना सातत्यपूर्ण सरावाने स्मरणशक्तीचा योग्य विकास होतो. आठवणी दीर्घ काळ टिकतात. कुठलेही एकच तंत्र न वापरता विविध स्मरण पद्धतींचा वापर करून पाहिल्यास अध्ययन अधिक
प्रभावी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -