राजपुरी ग्रामपंचायत व डोंगरी सुभा यंगस्टार मंडळातर्फे सन्मान ….
मुरुड,प्रतिनिधी (संतोष रांजणकर)- मुरुड तालुक्यातील राजपूरी ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीसूभा गावाचा सुपुत्र तन्मय रुचिता रुपेश शेळके याची भारतीय देशसेवेत वायुसेनेच्या अग्नीवीर पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजपूरी ग्रामपंचायत व डोंगरीसुभा यंगस्टार मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सरपंच सुप्रिया गिद्दी यांनी कुमार तन्मय याची वायुसेनेच्या अग्नीवीर पदी नियुक्ती करण्यात आल्याने डोंगरीसुभा गावाचे नाव उज्ज्वल केले असे सांगून त्याला उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या तर उपसरपंच इस्माईल जुबेर सिद्दीकी यांनी तन्मय याचा ग्रामपंचायत स्तरावर उचीत सन्मान करण्याचा मनोदय व्यक्त करुन त्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत सदस्य हेमंत नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात तन्मयचे कौतुक केले.
राजपुरी ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया गिद्दी, उपसरपंच इस्माईल जुबेर सिद्दीकी, सदस्य हेमंत नाईक, तन्मय चे आजोबा रविंद्र शेळके,आजी वर्षा शेळके, वडील रुपेश शेळके,आई रुचिता शेळके, चुलत आजोबा सुनील शेळके कुटुंबिय तसेच यंग स्टार मंडळाचे अ. हीरा चंद्र खेऊर जयेश भोसले अभिजित जाधव, रूणाल नाईक, नितीन चाफीलकर, अमोल मिरजणकर, निखिल चाफीलकर, सतेज मिरजणकर ,किरण शेळके, कुणाल शेळके, अमोल जाधव यावेळी उपस्थित होते.