Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीBeed news : बीडमध्ये भीषण रेल्वे अपघात! मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि २...

Beed news : बीडमध्ये भीषण रेल्वे अपघात! मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि २ जनावरं पडली मृत्यूमुखी

बीड : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये (Accident news) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता बीडमधील (Beed news) मलकापूर येथून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर येथे भरधाव वेगातील मालवाहू रेल्वेच्या धडकेत एका मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि २ जनावरं जागीच ठार झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना बीडच्या परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात घडली. मुंजा ढोणे असं मयत मेंढपाळाचं नाव आहे. परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ, मधुकर सरवदे व मुंजा ढोणे या दोघांनी आज मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या. यावेळी रेल्वे पटरीवरून मेंढ्या जात होत्या. परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारानजीक अचानक समोरून मालगाडी आली. मात्र दोन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे बचावासाठी वेळच मिळाला नाही.

क्षणार्धात मालगाडीने २२ मेंढ्या आणि दोन जनावरांना चिरडलं. मेंढपाळ मुंजा ढोणे यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर मधुकर सरवदे मात्र यातून बचावले आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -