Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक!

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक!

मेसेज किंवा फोन न करण्याचे केले आवाहन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक (Mobile Hack) झाले आहे. याची माहिती स्वत: सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

आज दुपारी १ च्या सुमारास सुळे यांनी ही पोस्ट करत कार्यकर्त्यांना व जनतेला सावध राहण्यास सांगितले आहे. हे अत्यंत महत्वाचे आहे असे म्हणत सुळे यांनी हा मेसेज केला आहे. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करून नये असंही त्या म्हणाल्या आहेत.

''माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. - सुप्रिया सुळे'', असं ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी लोकांना सावध केले आहे.

Comments
Add Comment