क्राइम – अॅड. रिया करंजकर
भारतीय स्त्री ही अनेक व्रतवैकल्प, देवधर्म, पूजाअर्चा अशा अनेक धार्मिक कार्यामध्ये स्त्रिया स्वत: पुढे असतात. कीर्तन, भजन, सप्ताह अशा अनेक ठिकाणी आपल्याला स्त्रिया दिसतील. या स्त्रियांना त्यांच्या माहेरच्या आणि पतीच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही अधिकार दिला जात नव्हता तरी या स्त्रिया धार्मिक कार्य मात्र मनापासून करत होत्या.
संविधानानंतर स्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आपला देश आधारला गेला. त्यामध्ये स्त्रियांनाही अनेक अधिकार दिले गेले. हिंदू कोड बिलने तर स्त्रियांना अनेक अधिकार दिले. त्याच्यातला एक अधिकार म्हणजे माहेरच्या प्रॉपर्टीत मुलीला असलेला अधिकार. पण काही स्त्रियांनी या अधिकाराचा एवढा गैरवापर केलेला आहे की, माहेरच्या लोकांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे. काही भावांना तर पुढच्या जन्मी बहीण नको अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. अशा काही स्त्रिया आहेत की ज्यांनी आपल्या भावांना रस्त्यावरही आणले आहे. बहीण-भावाच्या नात्यांमध्येही दुरावा निर्माण झाला आहे.
दादर, प्रभादेवी या ठिकाणी राहणारे कारेकर कुटुंब सुशिक्षित होते. त्यांचे आई-वडील, दोन मुलगे आणि एक बहीण असे कुटुंब होते. कारेकर कुटुंबातील आप्पा हे सरकारी नोकरीतून रिटायर झाले होते. त्यांनी तिन्ही मुलांची लग्न करून दिली होती. त्यांची पत्नी लागस स्वभावाची होती. त्यांनी दादर आणि प्रभादेवी इथे चाळीमध्ये एक रूम घेऊन ठेवला होता. एक रूम त्यांना एसआरएतून मिळाला होता. त्यांच्या ितन्ही मुलांना ते दोन रूम देण्याचे ठरले. मोठा मुलगा संजय यांनी स्वतःच्या कष्टाने प्रभादेवीला एक रूम घेतला. तो तिथे राहत होता आणि वडिलांनंतर आईचे सर्वकाही संजय बघत होता.
वडील जिवंत असताना प्रभादेवीचा जो वडिलांनी रूम घेतला होता तो वडिलांनी अजयच्या नावावर केला. दोन रूम दोन मुलांसाठी आता मुलीसाठी काय म्हणून त्यांनी मुलीचे लग्न, दोन्ही बाजूचा खर्च, त्यांनी स्वतः केला. दोन मुलांपेक्षा मुलीच्या लग्नामध्ये जास्त खर्च केले. एवढेच नाही तर सर्वात जास्त सोने त्यांनी मुलीला दिले. लग्न झाल्यानंतर त्यांनी मुलीला तसे स्पष्ट सांगितले. रेखाला बोलवून एक रूम घेऊ शकेल एवढी २० लाखांची रक्कम वडिलांनी दिली. तशी कागदपत्रे त्यांनी बनवली होती. दादरची रूम ही वडिलोपार्जित रूम होती. त्याच दरम्यान त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डर आला होता. त्याचा दृष्टिकोन एक होता की जर किती रूम खाली होतात आणि किती आपल्या ताब्यात मिळतात.
हा दृष्टिकोन त्या मालक आणि डेव्हलपरचा होता. त्यांना माहीत होते की, संजयचा रूम हा त्याच्या आजोबांच्या नावावर आणि त्याच्यानंतर त्याच्या वडिलांच्या नावावर आहे आणि तो अजून संजयच्या नावावर झालेला नाही. संजयची बहीण रेखा हिला नोटीस काढून तुझा प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे आणि तुझ्या भावाने तुझी सही घेतलेली नाही असे पत्र पाठवले. तिला ही गोष्ट समजताच तिने संजयला मिळणारी दादरची रूम त्यावर आपला अधिकार असल्याचे ती सांगू लागली. माझाही या रूमवर अधिकार आहे. मला अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे असे ती आई आणि भावांशी भांडू लागली.
ज्यावेळी तुझे लग्न झाले. दादरची जी रूम होती ती अजूनही डेव्हलपरकडे गेली नव्हती. आताच बिल्डर आलाय आणि तुला भविष्यात बनणाऱ्या घराची रक्कम पाहिजे. ही गोष्ट चुकीची आहे. तरी रेखा ऐकत नव्हती. तुम्ही दिलेले २० लाख परत करते पण मला हे घर पाहिजे म्हणून भावांशी भांडू लागली. दादरची रुमची दोन करोडोंनी रक्कम असेल तर तिला १ करोड रक्कम पाहिजे होती. तरच मी सही देईल. अशी ती आपल्या आई आणि भावंडांशी भांडू लागली होती. संजय आईला बोलू लागला की अजयला रूम नावावर करताना रेखाने त्याविषयी नकार दिला कारण त्यावेळी तिला बाबांनी पैसे दिले होते. आता माझ्या नावावर रूम करताना तिला करोडोंची जी किंमत नाहीच आहे त्या रूमची आता ती भविष्यात होणाऱ्या रूमची किंमत आता पाहिजे.
शेवटी या सर्व गोष्टीला वैतागून संजयने बहिणीच्या विरुद्ध न्यायालयाचा दरवाजा ठोकावला. कारण त्याला माहीत होते की आपल्या बहिणीला बिल्डरने भडकवलेलं आहे आणि ती त्याच्या नादाला लागून हे सर्व करत आहे. जे खरंच चुकीचे होते. रेखाने मालमत्तेसाठी चालवलेल्या भांडणामुळे तिचा दोन भावंडे आणि आई यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता.
ज्यावेळी एखाद्या मालमत्तेला शून्य किंमत असते त्यावेळी त्याला विचारले जात नाही. यामुळे काही बहिणींच्या हावरटपणाच्या स्वभावामुळे भावांना मानसिक त्रास होत असून रक्ताची नाती आज कोर्टाच्या दारात जाऊन उभी आहेत.
(सत्य घटनेवर आधारित)