‘या’ तारखेला लागणार निकाल
पॅरिस : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024 ) ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. मात्र सामन्याच्या काही वेळापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश फोगटचे वजन नियमापेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवले होते. त्यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न हुकले. त्यानंतर विनेशने या निर्णयावर आक्षेप घेत सीएएसमध्ये (CAS) संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली. या प्रकरणावर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आज कोर्टात विनेश फोगटची बाजू मांडली. मात्र या प्रकरणाचा निकाल काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे विनेशचे रौप्य पदक आणखी लांबणीवर गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक समितीच्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ‘सीएएस’कडे मागितलेल्या दाद मागितली होती. या प्रकरणाचा निर्णय आता १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत लागू शकतो, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली.