Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीJalgaon News : जळगावच्या विदयार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या!

Jalgaon News : जळगावच्या विदयार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या!

धरणगाव शाळेतील दहावीच्या विदयार्थींनींचा गेले ३१ वर्ष सुरू आहे उपक्रम

जळगाव : जिल्हयातील धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विदयालयाच्या दहावीच्या विदयार्थिंनी शाळेत तयार केलेल्या तीन हजार राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवून आपले स्नेहप्रेम जपण्याचा प्रयत्न केला आहे.

या उपक्रमाचे हे ३१ वे वर्ष आहे. विद्यार्थिनीच्या या उपक्रमाचे शिक्षण विभागाच्या नाशिक विभागीय मंडळाने पत्र पाठवून कौतुक केले, अशी माहिती उपक्रम प्रमुख राजेंद्र पडवळ यांनी दिली.

धरणगाव येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या दहावीच्या विदयार्थिनी गेले ३१ वर्ष सीमेवरील जवानांना स्वत: हाताने बनवलेल्या राख्या पाठवत आहेत.यंदा देखील दहावीच्या १५० वर विदयार्थिनींनी आपल्याला मिळालेला खाउचा पैसा,दिवाळीत मिळालेली भाउबीज या रकमेतून राखीसाठी लागणारे लोकरीचे रंगीत धागे,राखी सजवण्यासाठी लागणारे साहित्य विकत आणून राख्या बनवल्या. त्यांनी पालकांकडून यासाठी कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. शाळा सुरू होण्या अगोदर एक तास सर्व विदयार्थिनी एकत्र आल्या. चित्रकला क्राप्टचे शिक्षक आर.एन.पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले. वर्गशिक्षक लक्ष देतात. त्यानुसार या राख्या बनवल्या जातात.यंदा तीन हजार राख्या बनवल्या गेल्या. त्यात तिरंगा राख्या जास्त बनवल्या गेल्याचे उपक्रम प्रमुख पडवळ यांनी सांगितले.

बनवल्या गेलेल्या राख्या नाशिकच्या सैनिक केंद्राच्या माध्यमातून सीमेवर पाठवल्या जातात. विशेष म्हणजे सीमेवरून सैनिक बांधवांचे राखी मिळाल्याचे पत्र शाळेला येतात.काहींनी राखी मिळाल्यानंतर या मुलींना ओवाळणी देखील पाठवली असल्याचे पडवळ यांनी सांगितले. इंदिरा गांधी विदयालय गेले ३१ वर्ष हा उपक्रम राबवत असून या उपक्रमाची शिक्षण विभागाच्या नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने दखल घेत कौतुकाचे पत्र पाठवले आहे.उपक्रमशील शिक्षक असले तर शाळा किती चांगल्या प्रकारे मुलांमध्ये देशभक्ती जागवणारा उपक्रम राबवू शकते याचे हे उदाहरण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -