Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेSandeep Deshpande : एखादी गोष्ट करण्याआधीच परिणामांचा विचार करावा; अरे केलं तर...

Sandeep Deshpande : एखादी गोष्ट करण्याआधीच परिणामांचा विचार करावा; अरे केलं तर कारे होणारच!

तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा

ठाणे : ठाण्यात (Thane) गडकरी रंगायतन या सभागृहात शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाचा (Thackeray Group) मेळावा पार पडला. यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण, नारळ व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील एका कारची काचही फोडली. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संदीप देशपांडे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून गाडीच्या काचा फोडल्याच्या कृत्याचे समर्थन केले. एखादी गोष्ट सुरुवात करताना विचार करायचा असतो की पुढे त्याचे काय परिणाम होऊ शकतात. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचे नसते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.

संदीप देशपांडे म्हणाले, तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही अरे केले तर आम्ही कारे करणारच. मराठवाड्यात जे झालं ते आणि काल जो प्रकार घडला तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. हे कोणालाही आवडलेलं नाही. आपणही काचेच्या घरात राहतो. आपणही दौऱ्यावर जातो, सभा घेतो, याचं भान प्रत्येकाला असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने असंच करायचं ठरवलं तर महाराष्ट्रात काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

कालची घटना ही क्रियेला प्रतिक्रिया होती. त्यामुळे प्रतिक्रिया मिळाल्यानंतर सारवासारव करु नये. मराठा आंदोलकांच्या आडून राजसाहेबांवर हल्ला करण्यात आला. पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा ही संस्कृती कुठे गेली होती, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -