Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीThird Wave Coffee : कॉफीशॉपच्या वॉशरुममध्ये आढळला छुपा कॅमेरा! तब्बल दोन तास...

Third Wave Coffee : कॉफीशॉपच्या वॉशरुममध्ये आढळला छुपा कॅमेरा! तब्बल दोन तास चालू होते रेकॉर्डिंग

चक्क डस्टबिनमध्ये कॅमेरा अशा पद्धतीने लपवला की…

बंगळुरु : बंगळुरुच्या (Banglore) कॉफीशॉपमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरच्या बीईएल रोडवरील थर्ड वेव्ह कॉफी (Third Wave Coffee) आउटलेटच्या वॉशरुममध्ये चक्क छुपा कॅमेरा (Hidden camera) लपवल्याचे आढळले. एवढंच नव्हे तर तब्बल दोन तास रेकॉर्डिंग चालू होते. या वॉशरुममध्ये टॉयलेट सीटसमोरील डस्टबिनमध्ये फोन अशा पद्धतीने लपवण्यात आला होता की फक्त कॅमेऱ्यानेच रेकॉर्डिंग होऊ शकेल आणि फोन नजरेस पडणार नाही. हा फोन फ्लाइट मोडवर ठेवण्यात आला होता, जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही. एका महिलेने ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यावर सर्वत्र खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल घडली. वॉशरुममध्ये कॅमेरा लपवला असल्याचे एका महिलेच्या लक्षात आले. ताबडतोब कॅफेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. हा फोन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. महिलेच्या मित्राने तक्रार केल्याचे सदाशिवनगर पोलिसांनी सांगितले. यानंतर कॉफी शॉपच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आरोपीचे वय सुमारे वीस वर्षे असून तो कर्नाटकातील भद्रावती येथील रहिवासी आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७७ (महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो पाहणे, कॅप्चर करणे आणि प्रसारित करणे) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये त्याच्या विरोधात FIR नोंदवण्यात आली आहे.

थर्ड वेव्ह कॉफीने सोशल मीडियावर व्यक्त केली दिलगिरी

या घटनेच्या वादानंतर थर्ड वेव्ह कॉफीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. कंपनीने लिहिले की, बंगळुरूमधील आमच्या बीईएल रोड आउटलेटमध्ये घडलेल्या घटनेने आम्ही दु:खी आहोत. थर्ड वेव्ह कॉफीमध्ये आम्ही अशी कृती अजिबात सहन करत नाही. आम्ही आरोपीला तात्काळ बडतर्फ केले आहे. थर्ड वेव्ह कॉफी ही एक प्रसिद्ध कॉफी शृंखला आहे, ज्याचे आउटलेट संपूर्ण भारतात आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, भारतातील ६ शहरांमध्ये तिचे ९० हून अधिक कॅफे आहेत. थर्ड वेव्ह कॉफीचे एकट्या बंगळुरूमध्ये १० आउटलेट आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -