मुंबई: अनहेल्दी लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यामुळे अनेक समस्या सतावत आहेत. पोटात निर्माण होणारा गॅस अशाच गंभीर समस्यांपैकी एक आहे.
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक महागड्या औषधांची मदत घेतात. आरोग्यतज्ञांच्या मते सकाळी उठून काही कामे केल्याने यापासून सुटका मिळू शकते.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुरळीत होईल तसेच गॅस बनणार नाही.
सकाळी उठल्यावर आल्याचे पाणप्यायल्याने पोटातील गॅसची समस्या कमी होऊ शकते.
तेजपत्ता आणि दालचिनीमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात यामुळे गॅसपासून सुटका मिळते.
बडिशेपाचे दाणे चघळल्यानेही पोटाला थंडावा मिळतो आणि गॅसची समस्या कमी होते.
सकाळी उठल्यावर योगासन आणि प्राणायम केल्याने गॅसची समस्या दूर होते.