मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.यामुळे अनेकांनी बीएसएनएलची वाट धरली. तर बीएसएनएलकडे एक जबरदस्त प्लान आहे जो १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो.
९१ रूपयांचा प्लान
बीएसएनएल इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत लोकांना कमी किंमतीत अधिक फायदे देते. अशातच जर तुम्हाला कमी खर्चात तुमचे सिमकार्ड अधिक काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर बीएसएनएलचा ९१ रूपयांचा प्रीपेड प्लान चांगला आहे.
याशिवाय बीएसएनएलच्या या प्लानमध्ये लोकांना कॉलिंगची सुविधाही मिळते. दरम्यान, डेटा म्हणजेच इंटरनेटची सुविधा यात नाही. इंटरनेटसाठी तुम्हाला एक्सट्रा चार्ज द्यावे लागतील. तर या प्लानमध्ये १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंगची सुविधा मिळते.
२५ रूपये प्रति एसएमएससाठी द्यावे लागतात. जर तुम्ही या प्लानमध्ये इंटरनेटचा वापर करत आहात तर तुम्हाला १ पैसा प्रति एमबीवर द्यावा लागेल.
BSNLचा इंटरनेट प्लानही स्वस्त
बीएसएनएचा १८७ रूपयांचा प्रीपेड प्लानही अतिशय चांगला आहे. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा दिवसाला दिला जातो. याशिवाय लोकांना यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच १०० एसएमएस प्रति दिवसाला दिले जातात. हा प्लान २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. या हिशेबाने पाहिल्यास बीएसएनएलचा हा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे.