आमदार नितेश राणे यांचा घणाघात
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला कोरोना
मुंबई : मनोज जरांगे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपने राणे आणि दरेकर यांना आपल्यावर टीका करण्यासाठी ठेवलं आहे, असा आरोप केला. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जरांगेंना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, राणे आणि दरेकरजी सत्य सांगत आहेत. मराठा समाजाचं प्रबोधन करण्याचं आणि त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचं काम ते करत आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एका तरी मराठा तरुणाचा फायदा झाला का, याचा त्यांनी आम्हाला हिशोब द्यावा, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.
पुढे ते म्हणाले, त्यांच्या आंदोलनामुळे मराठ्यांचा कमी आणि मुस्लीम लोकांचाच जास्त फायदा झाला. EWS मधून जेव्हा पोलीस भरती निघाली, तेव्हा ९० टक्के लोक हे मुस्लीम समाजाचे होते. म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मराठ्यांसाठी लढताय की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांचा फायदा बघताय, याची स्पष्टता द्या.
मनोज जरांगे जेव्हा गोधडीत होते तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलं आहे. तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी ३०-४० मराठा आरक्षणाचे मोर्चे काढलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाचं हित त्याने आम्हाला सांगू नये. राणे आणि दरेकरांना तू बोलू नकोस कारण तू नवीनच शिकायला आलेल्या शाळेतले ते प्राध्यापक आहेत. तू आधी हे सांग की तू मराठ्यांचा आहेस की मुसलमानांचा आहेस? कारण तुझ्या दाढीवर आता आम्हाला संशय यायला लागला आहे, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला कोरोना
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण बिघडवलं आहे, महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर नितेश राणे यांनी संजय राऊतांना खडसावलं. नितेश राणे म्हणाले, संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, कीड आहे. याच्यावर व्हॅक्सिन म्हणून आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा तू आणि तुझा मालक जी कीड आहात, त्याबद्दल बोल, असं नितेश राणे म्हणाले.
परमवीर सिंग एकेकाळी उद्धव ठाकरेंचे लाडके
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना महाविकास आघाडीच्या काळात वसुली कशी व्हायची याचा पॅटर्न आणि सत्यता सांगितली. परमवीर सिंग हा एक आरोपी आहे, सचिन वाझे खोटारडा आहे हे सांगणारे संजय राजाराम राऊत, अनिल देशमुखसारख्या माणसांना मविआच्या काळात हीच लोकं किती लाडकी होती, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणजे परमवीर सिंग यांचं आडनाव सिंग होतं की ठाकरे, एवढंच बघायचं बाकी राहिलं होतं. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन भाजपाच्या नेत्यांना अटक करायची, खोट्या केसेस दाखल करायच्या, पत्रकारांना अटक करायची हा सगळा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी या परमवीर सिंगच्या माध्यमातूनच सुरु ठेवला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. जर हिंमत असेल तर संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी परमवीर सिंगसोबत नार्को टेस्ट करा, असं आव्हानही नितेश राणे यांनी दिलं.
नितेश राणे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले की, तुझा आणि तुझ्या मालकाचा बुरखा फाडण्याचं काम परमवीर सिंग आणि सचिन वाझे करत आहेत. ही तर फक्त सुरुवातच असेल, हे १० टक्केच असतील, उरलेले ९० टक्के जेव्हा बाहेर येतील तेव्हा महाराष्ट्राची जनता त्यांना चपला मारेल, असं नितेश राणे म्हणाले.
घाणेरडी आंदोलनं करण्याचे आदेश देणं हा उद्धव ठाकरेचा इतिहास
राज ठाकरे काल बीड दौऱ्यावर असताना त्यांची गाडी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी थांबवून त्यावर सुपाऱ्या फेकण्याचा जो काही प्रकार झाला, अशा प्रकारची घाणेरडी आंदोलनं करण्याचे आदेश देणं हा उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे. त्यानंतर जेव्हा मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले की तुमच्या नेत्यांच्याही गाड्या फिरतील, दौरे होतील तेव्हा हातभर फाटलेल्या संजय राऊतने म्हटलं की ती उबाठाची भूमिकाच नव्हती. मनोहर जोशी साहेबांना शिवाजी पार्कवर जे स्टेजवरुन उतरवलं तो आदेश उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेचाच होता. असे घाणेरडे आदेश मातोश्रीवरुनच येतात आणि मग अंगाशी आलं की मी तो नव्हेच हे सांगण्याचं काम त्यांचा निर्लज्ज कामगार करतो, असा आरोप नितेश राणे यांनी केला.