मुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) डिजिटल पेमेंट (Online payment) पद्धतींचा वापर करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असून मुंबई सेंट्रल विभागात अखंड ऑनलाइन पेमेंट पर्याय सुलभ करण्यासाठी ६३२ डायनॅमिक क्युआर कोड स्थापित करण्यात आले आहेत.
२५जुलैपासून क्युआर कोड उपकरण व्यवहार सुरू झाले आणि ७ ऑगस्ट पर्यंत ७८ लाखांहून अधिक डिजिटल पेमेंट नोंदवणाऱ्या सुमारे ७ लाख प्रवाशांना ३१ हजारांहून अधिक तिकिटे प्रवाशांना देण्यात आली आहेत . क्युआर कोड उपकरणे स्क्रीनवर लागू रक्कम प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना विविध ऑनलाइन पेमेंट पद्धती आणि अनुप्रयोगांद्वारे पेमेंट करता येते.
या नाविन्यपूर्ण पध्दतीमुळे व्यवहाराची प्रक्रिया जलद होते.प्रतीक्षा वेळ कमी होईल. हे क्युआर कोड उपकरण मुंबई मध्य विभागातील सर्व युटीएस काउंटरवर यशस्वीरित्या कार्यरत आहे.ज्यामध्ये उपनगरीय आणि उपनगरी नसलेले दोन्ही विभाग समाविष्ट आहेत. तथापि,पीआर एस काउंटरवर क्युआर कोड उपकरणे बसवण्याचे काम सध्या सुरू आहे.