Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबालिश, अर्धवटरावने सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्वाला दिली तिलांजली!

बालिश, अर्धवटरावने सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्वाला दिली तिलांजली!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारले

मुंबई : बालिश, अर्धवटराव, सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्वाला तिलांजली देणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करत आहेत. या अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचत असल्याची खरमरीत टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असल्याचे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सल्लागार उद्धव ठाकरेंनी बांगलादेशाचा दौरा करावा असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना लगावला.

बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्याक समुदायाविरोधात सुरु असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत असल्याचे बावनकुळे म्हणाले. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते, असे बावनकुळे म्हणाले. बांगलादेशातील भयंकर, भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करुन ते आदरणीय मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू, बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

ज्यांना या परिस्थितीतही राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणा-या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे, असा उपरोधिक टोलाही बावनकुळे यांनी लगावला. तेथे हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरुर लोटांगण घालावं, परंतु त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान (?) पाजळू नये, असेही बावनकुळे यांनी अर्धवटरावांना फटकारले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -