Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडी6000mAh बॅटरी आणि DSLR सारखे कॅमेरा फोनची किंमत झाली कमी, फोटोग्राफीसाठी जबरदस्त...

6000mAh बॅटरी आणि DSLR सारखे कॅमेरा फोनची किंमत झाली कमी, फोटोग्राफीसाठी जबरदस्त आहे हा स्मार्टफोन

मुंबई: स्मार्टफोनच्या(smartphone) किंमती कमी होण्याची प्रतीक्षा सगळेच करत असतात. जर एखाद्या फोनच्या किंमती कमी झाल्या तर युजर्स खूप खुश होतात. कारण त्यांना कमी पैशांमध्ये एक नवा फोन खरेदी करण्याची संधी मिळते. असेच व्हिवोच्या फोनसोबत झाले आहे.

कमी झाली या फोनची किंमत

व्हिवोच्या या फोनचे नाव Vivo Y58 5G आहे. हा फोन काही आठवड्यांआधी कंपनीने ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लाँच केला होता. या फोनची किंमत १९,४९९ रूपये आहे. मात्र आता कंपनीने याच्या किंमतीत १००० रूपयांची घट केली आहे. यामुळे या फोनची किंमत आता १८,४९९ रूपये झाली आहे.

व्हिवोचा हा फोन नव्या किंमतीला व्हिवो इंडिया ई स्टोर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडियासह अनेक शॉपिंग पार्टनर प्लॅटफॉर्मवर अपडेट करण्यात आला आहे. व्हिवोने या फोनमध्ये दोन कलर ऑप्शन दिले आहेत. हा फोन सनडरबॅन्स ग्रीन आणि हिमालयन ब्लू रंगात लाँच करण्यात आला आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास यात ६.७२ इंचाचा एलसीडी पॅनेल देण्यात आला आहे. यात FHD+ रेझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 1024 नीट्स पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे. या फोनच्या प्रोसेसरबाबत बोलायचे झाल्यास कंपनीने यात Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC चिपसेट दिला आहे. यात ग्राफिक्ससाठी Adreno 613 GPU सोबत येतो. युजर्स मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवू शकतात.

या फोनच्या कॅमेऱ्या बद्दल बोलायचे असल्यास कंपनीने मागील भागात 50MP चा नवा मेन कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 44Wची फास्ट चार्जिंगही दिली आहे. हा फोन Android 14 वर आधारित ओएस Funtouch OS 14 कस्टम स्किनवर रन करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -