Neeraj Chopra : 'खेळ संपलेला नाही, खूप काही बाकी आहे' रौप्य पदक पटकवल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया!

पंतप्रधान मोदींनी देखील केले कौतुक


पॅरिस : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) रौप्य पदक (Silver Medal) जिंकत भारताला पाचवे पदक मिळवून दिले आहे. भारताला या गोल्डन बॉयकडून सुवर्णपदक मिळवण्याची आशा होती. मात्र नीरज चोप्राने ८९.४५ मीटर भालाफेक केला. तर त्यामधील सहापैकी चार थ्रो फाऊल गेले. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकत सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू बनला आहे. दरम्यान, रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याचे भरघोस कौतुक केले आहे.



काय म्हणाला नीरज चोप्रा?


रौप्यपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'सध्या पदक मिळालं आहे. हातात तिरंगा आहे. मला खूप आनंद होत आहे. खेळ संपलेला नाही, खूप काही बाकी आहे. बऱ्याच काळापासून मी दुखापतीचा सामना करतो आहे. दुखापतीमुळे जेवढ्या स्पर्धा खेळायला हव्यात तेवढ्या मी खेळू शकत नाहीये. दुखापतीमुळे मला माझ्या चुकांवर काम करता येत नाहीये. या चुकांवर काम झाल्यास चांगला परिणाम दिसेल.


तसेच पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदने भाला फेकल्यानंतर मला मनातून वाटत होते की आपण हे करू शकतो. मी आतापर्यंत ९० मीटरपर्यंत भाला फेकलेला नाही. पण मी हे करू शकतो असे मला अंतर्मनातून वाटत होते. मी ८९ मीटरपर्यंत भाला फेकू शकलो. माझी ही कामगिरी काही कमी नाही. पण खेळ अजून संपलेला नाही. आणखी खूप काही बाकी आहे. ज्याने सुवर्णपदक पटकावले त्याने मेहनत केली आहे, त्याच्या कामगिरीचे कौतुक करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली'.



पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक


नीरज चोप्राच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्याचे कौतुक केले आहे. नीरजच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. नीरज पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित करित राहील, असे मोदी म्हणाले.

Comments
Add Comment

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना