मुंबई: आपल्याकडे एक चारचाकी गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र अनेकदा बजेटमुळे तसेच गाड्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते.
मात्र या महिन्यात कार कंपन्या कार घेणाऱ्यांसाठी चांगलीच सूट देत आहेत. जर तुम्ही कमी खर्चात गाडी घेण्याचा विचार करत आहात तर ही चांगली संधी आहे.
किंमत १५.४९ लाख
टाटा मोटर्स आपली प्रसिद्धी एसयूव्ही सफारीवर१.४९ लाख रूपयांपर्यंत फायदे देत आहे. ही एसयूव्ही २.० लीटर डिझेल इंजिनसह येते.
किंमत १४.९९ लाख
टाटा हॅरियरच्या खरेदीवर ग्राहकांना या महिन्यात १.२ लाख रूपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. ही एसयूव्ही २.० लीटर डिझेल इंजिनसह येते.
किंमत ७.९९ लाख
टाटा नेक्सॉनवर कंपनी साधारण १ लाख रूपयांपर्यंतची सूटची घोषणा केली आहे. ही एसयूव्ही १.२ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनसह येते.
किंमत ७.९४ लाख
ह्यंदाय व्हेन्यूर या महिन्याला ७०,६२९ रूपयांचे फायदे मिळत आहेत. याशिवाय ग्राहकांना ५९९९ रूपयांच्या पेमेंटवर २१,६२८ रूपयांच्या किंमतीचे अॅक्सेसरीज पॅकेजही खरेदी करू शकता.
किंमत ६.१३ लाख
ह्युंदायची सगळ्यात स्वस्त एसयूव्ही Exter च्या खरेदीवर ग्राहकांना ३२, ९७२ रूपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. याशिवाय ४,९९९ रूपयांमध्ये १७.९७१ रूपयांच्या अॅक्सेसरीज पॅकेजही ऑफर केले जात आहे.
किंमत ११.९१ लाख
होंडाची पॉवरफुल एसयूव्हीवर या महिन्यात ६५ हजार रूपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. ही एसयूव्ही १.५ लीटर पेट्रोल इंजिनसह येते.
किंमत २०.५५ लाख
होंडा सिटी हायब्रिडवर कंपनी ९० हजार रूपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. यात १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
किंमत ६ लाख
Renault Kigerवर कंपनी ४० हजार रूपयांपर्यंत डिस्काऊंड ऑफर करत आहे. ही एसयूव्ही १.० लीटर पेट्रोल इंजिनच्या पर्यायासोबत येते.19