मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने सहावे पदक मिळवले आहे. अमन सहरावतने पुरूषांच्या ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने प्युर्टो रिकोच्या डारियन क्रूझला १३-५ असे हरवले. हे भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४मधील हे सहावे पदक आहे. भारताने आतापर्यंत या ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि ५ कांस्यपदक जिंकले आहेत.
अमन सहरावत या कुस्तीमध्ये सुरूवातीपासूनच वरचढ ठरला होता. प्रतिस्पर्धी कुस्तीपटूने एकवेळ ३-२ अशी आघाडी घेत रंगत आणली मात्र त्यानंतर अमनने जबरदस्त कमबॅक करत कुस्ती जिंकली.
१६ वर्षांची परंपरा राखली कायम
भारत २००८ बीजिंग ऑलिम्पिकपासून कुस्तीमध्ये नेहमीच ऑलिम्पिक पदक जिंकत आलेला आहे. २००८मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला होता. सुशीलने त्यानंतर २०१२मध्ये आपल्या पदकाचा रंग बदलत रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी योगेश्वर दत्तने कांस्यपदकाची कमाई केली होती. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत तिरंगा फडकावला होता. तर २०२०मध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनियाने तर आता अमन सेहरावतने ही परंपरा कायम राखली.
२००८ बीजिंग ऑलिम्पिक – सुशील कुमार(कांस्य पदक)
२०१३ लंडन ऑलिम्पिक – सुशील कुमार(रौप्य पदक), योगेश्वर दत्त(कांस्य)
२०१६ रिओ ऑलिम्पिक – साक्षी मलिक(कांस्यपदक)
२०२० टोकियो ऑलिम्पिक – रवी दहिया(रौप्य पदक), बजरंग पुनिया(कांस्य)
२०२४ पॅरिस ऑलिम्पिक – अमन सहरावत(कांस्यपदक)