Saturday, May 10, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Monkeypox Virus : आफ्रिकेत वाढतोय मंकीपॉक्सचा व्हायरस!

Monkeypox Virus : आफ्रिकेत वाढतोय मंकीपॉक्सचा व्हायरस!

'ही' आहेत लक्षणे आणि उपाय


केप टाऊन : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात डेंग्यू, झिका, चांदीपुरा, चिकनगुनिया अशा आजारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता आणखी एका आजाराची भर पडत आहे. आफ्रिकेत सध्या मंकीपॉक्स या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. गतवर्षी मंकीपॉक्स या आजाराने थैमान घातले होते. त्यानंतर आता आफ्रिकेत हा व्हायरस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आफ्रिकेत नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे जो माकडांपासून मानवांमध्ये पसरतो. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखी असतात आणि त्यामुळे मानवांमध्येही गंभीर समस्या उद्भवू शकतात. मंकीपॉक्स विषाणू किती धोकादायक आहे आणि ते कसे टाळता येईल हे जाणून घेऊया.



मंकीपॉक्सची लक्षणे


मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा यांचा समावेश होतो. यानंतर चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर लाल पुरळ उठतात. हे पुरळ हळूहळू फोड आणि खरुजांमध्ये बदलतात. हा विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक संपर्कातून, कपडे किंवा बिछान्यातून इतर माणसांमध्ये पसरू शकतो.



असा करा बचाव



  • संक्रमित प्राणी आणि लोकांपासून अंतर ठेवा.

  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला आणि सामाजिक अंतर पाळा.

  • आपले वैयक्तिक सामान आणि कपडे स्वच्छ ठेवा.

  • आरोग्य समस्या असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Comments
Add Comment