Tuesday, May 13, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या हॉकी संघावर पैशांचा पाऊस

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या हॉकी संघावर पैशांचा पाऊस

मुंबई: हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकच्या १३व्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय संघाच्या विजयानंतर हॉकी इंडियाने खेळाडूंसाठी बक्षिसाची घोषणा केली आहे.


हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी १५ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. तर संघासोबत कोचिंग स्टाफमधील प्रत्येक सदस्याला ७.५लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.


हॉकी इंडियाने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले, हॉकी इंडिया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला १५ लाख रूपये आणि सहकारी स्टाफला साडेसात लाख रोख रूपये पुरस्कार देण्याची घोषण करते.


टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर पॅरिसमध्ये सलग दुसरे कांस्यपद हॉकी इंडियाने जिंकले. त्यांनी कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनला २-१ असे हरवले. हॉकी संघाचा द वॉल मानल्या जाणाऱ्या श्रीजेशसाठी हा अखेरचा सामना होता.विजयानंतर श्रीजेशला खांद्यावर बसवून हरमनप्रीतने मैदानाला चक्कर मारली. यावेळी अनेक भारतीयांच्या डोळ्यात पाणी तरळले.


जर्मनीच्या हातून सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर दीड दिवसांनी भारतीय संघ रिकाम्या हाती परतायचे नाही या निश्चयानेच मैदानात उतरला होता. एका गोलने पिछाडीवर असतानाही भारताने जोरदार कमबॅक केले आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडीही घेतली.

Comments
Add Comment