कोल्हापुर : कोल्हापुरातील (Kolhapur) ऐतिहासिक आणि प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली. या भीषण आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नाट्यगृह नामशेष झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती. शाहू महाराज यांच्या कालावधीत पॅलेस थिएटर म्हटले जात असे. शॉकसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे
विशेष म्हणजे आज शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच थिएटरला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.