नवी दिल्ली: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार तुरूंगातून बाहेर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आबकारी धोरण प्रकरणात कथिळ घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन दिला.
आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या वकिलांनी दिल्लीतील न्यायालयात जामिनाचा बाँड भरला आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ते गेल्या १७ महिन्यांपासून तिहार तुरुंगात होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के वी विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की सिसोदिया १७ महिन्यांपासून ताब्यात आहे आणि आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली नाही यामुळे ते लवकर सुनावणीच्या अधिकारापासून वंचित झाले. खंडपीठाने हे ही म्हटले की या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात पाठवणे योग्य ठरणार नाही. यावेळी खंडपीठाने सिसोदिया यांना १० लाख रूपयांच्या जातमुचलक्यावरआणि त्याच रकमेच्या दोन जामीनावर सोडण्याचे आदेश दिले.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी २०२३मध्ये अटक केली होती. उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यानंतर ही पॉलिसी रद्द करण्यात आली होती. ईडीने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ९ मार्च २०२३ला अटक केली होती.